
कल्याणमध्ये तरुणाला घातला 4 लाख 9 हजार रुपयांचा गंडा
दिनेश जाधव : कल्याण
कल्याणच्या बेरोजगार तरुणाला मोठ्या पदावरील नोकरीचे आमिष दाखवून त्याच्या खत्यातून चार लाख रुपये उकळल्याची घटना महात्मा फुले पोलीस ठण्याचा हद्दीत घडली आहे. यासंदर्भात महतमा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशाल शर्मा आणि कृष्णा रामाराव अशी आरोपींची नावे आहेत.
कल्याण पश्चिम येथे राहणारे योगेश चेऊलकर यांनी नोकरीसाठी एका ठिकाणी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांची ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेण्यात आली. यावेळी कॉग्नीजन्ट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीतील तीन अधिकाऱ्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. हे तिन्ही पदाधिकारी बोगस असून त्यांनी नोकरीसाठी तुमची निवड झाल्याचे सांगत नोंदणी प्रक्रियेसाठी साडेसहा हजार रुपये द्या असे सांगितले. योगेशने हे पैसे देताच पुन्हा कागदपत्र पडताळणीसाठी 18 हजार रुपये देण्यास सांगितले हे पैसे देखील योगेश यांनी दिले. त्यानंतर योगेश यांना एक लिंक पाठवून दिली. तुमच्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करायची आहे त्यासाठी एक लिंक देतो ती लिंक उघडा असे सांगितले. योगेश यांनी लिंक उघडताच भामट्यांनी योगेश यांच्या एचडीएफसी बँक अंधेरी शाखा, कल्याण मधील संतोषी माता रोड शाखा आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सात व्यवहार करुन योगेश यांच्या बँक खात्या मधून खोटी कारणे देऊन चार लाख नऊ हजार ६९४ रुपये परस्पर वळते केले. योगेश यान हे लक्षात येताच त्यांनी भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली. महात्मा फुले पोलिसांनी महैती तंत्रज्ञान खात्याकडे ही तक्रार वर्ग केला असून तपास सुरू असल्याची माहिती दिली.