व्यापाराला जीवे मारणाऱ्याची धमकी देत 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या 4 आरोपी गजाआड 

व्यापाराला जीवे मारणाऱ्याची धमकी देत 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या 4 आरोपी गजाआड 

8 तासात गुन्हा उघडकीस आणून 4 आरोपीना गजाआड करण्यात मानपाडा पोलिसांना यश

दिनेश जाधव : डोंबिवली 

डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिमंत नाहार यांचे डिलिक्स प्लायवूड हे दुकान आहे. 3 ऑगस्ट रोजी संजय विश्वकर्मा नावाचा एक इसम आला. त्याने प्लायवूड संदर्भात काही व्यवहार केले. अडव्हान्सचे पैसे एटीएममधून काढून देतो असे सांगून दुकानापासून काही अंतरावर घेऊन गेला. तिथून हिंमत नाहार यांना एका गाडीत घेऊन जात. त्यांचे अपहरण केले. काही तासातच हिंमत यांचे पुतणो जितू यांना फोन आला. फोन करणा:या व्यक्तीने हिंमत याना सोडण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली. जितू यांनी या संदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

कल्याणचे डिसीपी सचीन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी तपासासाठी सुनिल तारमळे आणि अविनाश वनवे या पोलिस अधिका:यांची पथके नेमली. पोलिसांचा तपास सुरु झाला. अपहरण करणारा व्यक्ती जितू यांना पैसे घेऊन काही ठिकाणी बोलवित होता. जितू यांना मुंबई आग्रा रोडवरील गोठेघर गावाजवळील एका बोगद्याच्या ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले. जितू हे पैसे घेऊन गेले. पोलिसांची चार पथके गावक:यांच्या वेशात गोठेघर परिसरात आधीच दबा धरुन बसली होती. थोडय़ाच वेळात त्याठिकाणी एक झायलो कार आले. त्यात तीन व्यक्ती होते. जितू याने आधी काकांना मला माङया ताब्यात द्या असे सांगितले. त्याचवेळी पोलिसांनी झायलो कारला घेरले. गावातील एका खोलीत हिंमत नाहार यांना कोडून ठेवले होते. त्यांची त्याठीकाणाहून सुटका केली. या प्रकरणी संजय विश्वकर्मा, संदीप रोकडे, धर्मराज कांबळे आणि रोशन सावंत या चोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मानपाडा पोलिसांच्या या कामागिरीचे सर्वत्र कोतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: