सहा वर्षांच्या मुलाचा इमारतीच्या लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू

सहा वर्षांच्या मुलाचा इमारतीच्या लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू

दिनेश जाधव : डोंबिवली

बाळा मी तुला मारणार नाही, ओरडणार नाही पण तू परत ये असे शब्द होते आजूबाजूच्या शेजारच्यांचे. एका सहा वर्षीय मुलाचा अनधिकृत बांधकामात असणाऱ्या लिफ्टच्या खड्ड्यात पडून बुडून मृत्यू झाला. दरम्यान त्याचा मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शस्त्री नगर रुग्णालयात नेण्यात आला आहे. डोंबिवलीतील सगरली येथील विघ्नहर्ता इमारतीच्या तळमजल्यावर राहणारा वेदांत जाधव हा सहा वर्षांचा मुलगा एका अनधिकृत इमारतीतील लिफ्टच्या खड्ड्यात पडून मृत्यू पावला. मात्र त्याचा सांभाळ आजी आजोबा बाबा यांच्या व्यतिरिक्त आजूबाजूला राहणारे शेजारी करत होते. नेहमीच वेदांत या इमारतीमध्ये खेळण्यासाठी जात असे. मंगळवारी सकाळी 11.30 वाजता हरवलेल्या वेदांत बराच वेळ झाला तरी सापडेना. शोधाशोध झाल्यानंतर थोड्यावेळाने लिफ्टच्या खड्ड्यात त्याचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्याला काढले खरे मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या खड्ड्यात पडलेला बॉल काढण्यासाठी हा मुलगा त्या खड्ड्यात गेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अनोखे प्रेम आणि नाते शेजारी राहणारे अवंतिका महाडीक आणि इला महाडीक असे या दोघांचे नाव आहे. मात्र यातील अवंतिका महाडीक यांचा वेदांतवर अत्यंत जीव होता. त्याचे लाड पुरवणे त्याला खाऊ देणे, ओरडणे, अभ्यास घेणे या सर्व गोष्टी अवंतिका करत होत्या.

महापालिका नेमकी काय करते. ? या आधी देखील अशाच प्रकारे अनधिकृत इमारतीच्या लिफ्टच्या खड्ड्यात पडून एक मुलगा दगावल्याची घटना सागाव येथे घडली होती. मात्र त्यानंतर देखील महापालिका प्रशासन ढीम्म झोपेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली. ज्या इमारतीच्या खड्ड्यात पडून वेदांत गेला त्या इमारतीचे २०१२ पासून बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हे सगळं कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: