
सोनसाखळी चोरी करणारे दोन जण अटकेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
चोरटे सराईत गुन्हेगार
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण– कल्याण रामबागेतील 49 वर्षीय महिलेची सोनसाखळी चोरी करुन चोरटे पसार झाले होते. 11 जून रोजी ही घटना घडली होती. या चोरी प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अटक आरोपींच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात 15 गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून सोने आणि मोटासायकल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती कल्याणचे ए॰सी॰पी॰ उमेश माने पाटील यांनी दिली आहे.
अटक आरोपींची नावे रिजवान इस्माईल शेख आणि मोहमंद आलम असलम कुरेशी या दोघांना सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. दोघेही मुंब्रा शिळफाटा येथे राहणारे आहे. घटना घडल्यापासून अवघ्या आठ दिवसात या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींचा रिमांड घेऊन त्यांच्याकडून अन्य गुन्ह्याची उकल केली आहे. त्यांच्याकडून 1क् ग्रॅम वजनाचे पाच लाख रुपयांचे सोने आणि चार मोटार सायकल जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मोटार सायकलची किंमत 6 लाख 90 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील छत्री बंगल्याजवल भाग्यश्री हनुमंते यांच्या केक शॉपमध्ये केक घेण्याच्या बहाण्याने आलेल्या एका तरुणाने हनुमंते यांच्या पर्समधील 30 हजार रुपायांची रोकड लंपास केली आहे. ही घटना 27 जून रोजी घडली. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंदार गुलाब जैसवाल 27 याला अटक केली आहे. चोरीस गेलेली रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली आहे. अवघ्या दोनच दिवसाच हा गुन्हा उघड करण्यात महात्मा फुले पोलिसांना यश आले आहे.