
चोरी केलेल्या बकऱ्यांची गाडी पकडली
– वाहतूक पोलीस वॉर्डन यांच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस
दिनेश जाधव : कल्याण
वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे
कसारा येथून बकरी चोरी करून पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या आरोपींना पकडण्यात यश आले आहे.
मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण तोंडावर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने बकऱ्याची मागणी वाढली असल्याने बकरी चोरीच्या घटनांना वेग येताना दिसून येत आहे. बैल बाजार येथील वलीपिर रस्त्यावर सेवा बजावत असणाऱ्या पोलीस वॉर्डन आबिद मोमीन, मुशीर शेख, फरहान फालके यांना कला काचा असणारी एक संशयित गाडी नजरेस पडली. त्यांनी त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी चालकाने गडीसह जोरदार पाळण्याचा प्रयत्न केला असता. पोलीस वॉर्डन यांचा संशय आणखी बळवला. ते त्या गाडीचा पाठलाग करू लागले. टाटा पॉवर जवळ येताच त्यांनी गाडी आणि बकरे तेथेच ठेवून पल काढण्याचा पुन्हा प्रयत्न केला असता त्यातील एका आरोपीला पकडण्यात यश आले तर दुसरा आरोपी मात्र पळून जाण्यास यशस्वी झाला. पकडण्यात आलेला आरोपी आणि बकऱ्यानी भरलेली गाडी पोलीस वॉर्डन यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यातील वरिष्ठांकडे सोपवली असून महात्मा फुले पोलिसांनी या वाहतूक पोलीस वॉर्डनचे कौतुक केले आहे. अधिक तपास महात्मा फुले पोलीस ठाणे करत आहे.