डोंबिवलीकर व्यापाऱ्याचे 35.41 लाखांचे दागिने लंपास

डोंबिवलीकर व्यापाऱ्याचे 35.41 लाखांचे दागिने लंपास

दिनेश जाधव : डोंबिवली

डोंबिवली : पूर्वेकडील फडके रोडला असलेल्या चिराग अपार्टमेंटमध्ये राहणारे धनसुख पोपटलाल जैन (40) यांचा सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यापाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी कल्याण पश्चिमेकडील वायलेनगरमध्ये राहणाऱ्या विश्वनाथ बाबुराव जगताप व त्याचा मामेभाऊ सागर अर्जुन साळुंखे यांच्या विरोधात भादंवि कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 5 मे रोजी दुपारी एकच्या सुमारास विश्वनाथ जगताप व त्याचा मामेभाऊ सागर साळुंखे हे दोघे घरी आले. त्यांनी संगनमताने व कपटीपणाने आपली फसवणूक करण्याच्या इराद्याने नवीन दुकान विकत घेतले असल्याचे सांगितले. सदर दुकानाची 6 जून रोजी ओपनिंग असल्याचे खोटे सांगून या दुकानामध्ये डिस्प्लेकरिता सोन्याचे दागिने पाहिजेत, त्यातील काही दागिने ते चांगल्या किंमतीने विकत घेणार असल्याचे आमिष दाखवून व उर्वरीत दागिने दुकानाची ओपनिंग झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी परत करण्याचे आश्वासन देऊन आपल्याकडून 678 ग्रॅम वजनाचे 35 लाख 41 हजार 600 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन गेले. मात्र हे दागिने परत न करता स्वत:जवळ ठेवून स्वतःच्या फायद्याकरिता वापरून त्यांचा अपहार करून आपली आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप धनसुख जैन यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी सपोनि वाय. पी. सानप अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: