
प्रेयसीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या
– मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिनेश जाधव : डोंबिवली
एका तरुणीची हत्या करून प्रियकराने स्वतः आत्महत्या केल्याची खबळजनक घटना डोंबिवली येथे घडली. दरम्यान या संदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कासा रिव्हो येथे राहणारी ललिता सुरेश काळे (२९) आणि अनिल साळुंखे (३३) अशी या दोघांची नावे आहेत. अनिल आणि ललिता या दोघांचे गेल्या पाच वर्षापासून प्रेम संबंध होते. त्यांनतर ललिता हिने लग्न करूया असा तगादा अनिल कडे लावला. मात्र अनीलचे लग्न झाले असून त्याला दोन मुलं आहेत. त्यांच्या कुटुंबियां समवेत तो नाशिक येथे राहतो असे तिला समजले. त्यानंतर तिने देखील लग्न करण्याचा निर्णय घेत एका मुलाशी साखरपुडा केला. मात्र याचाच राग मनात ठेवून अनिल याने ललिताचे घर गाठले. त्यानंतर रात्री ललिताचा खून करून त्याने स्वतःचा खून केल्याचे समोर आले. ही घटना रविवारी घडली असून सुरुवतीला दोघांनी आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून बांधण्यात आला होता. मात्र पोस्ट मार्टन रिपोर्ट नंतर ललिताची हत्या असून अनिलने आत्महत्या केल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत.