कल्याणमधील कुप्रसिध्द गुंड स्थानबद्ध

कल्याणमधील कुप्रसिध्द गुंड स्थानबद्ध

दिनेश जाधव : कल्याण

महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असणाऱ्या एका सराईत नामचीन गुंडास एमपीडीए अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तांनी स्थान बद्ध तेची कारवाई करून एक वर्षाकरिता त्याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.
कल्याण पश्चिमेतील जोशीबाग परिसरात कुप्रसिद्ध गुंड शाहबाज एजाज सय्यद (27) असे स्थानबद्ध केलेल्या गुंडाचे नाव असून त्याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न गैर कायद्याची मंडळी जमवून दंगा करणे दमदाटी तसेच मालमत्ते विषयी व अन्य अशा सात गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत. ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी शहरात दहशत पसरविणार्‍या व सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने त्यानुसार सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलिस ठाण्यांनी कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: