सत्ताधारी पक्षाचेच ठेकेदार असल्याने नालेसफाईत भ्रष्टाचार

सत्ताधारी पक्षाचेच ठेकेदार असल्याने नालेसफाईत भ्रष्टाचार

– भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

दिनेश जाधव : कल्याण

पावसाळा जवळ तरीही कल्याण डोंबिवलीत नालेसफाईची कामे अपूर्ण

नालेसफाई दौऱ्यात अधिकारी कर्मचार्यावर आमदार संतापले

कल्याण : मुख्य नाले सफाईच्या कामात भ्रषटाचार झाला असून सत्ताधारी पक्षाचे ठेकेदार असल्यामुळे अधिकाऱ्यांना दबून राहावं लागतं, नालेसफाईच्या कामावर अधिकाऱ्यांच नियंत्रण नसल्याचा आरोप कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. आमदार गायकवाड यांनी आज कल्याण पूर्व परिसरात महापालिकेकडून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त करत अधिकारी कर्मचाऱ्यांवर संतापत कामे लवकर पूर्ण करा अशी तंबी दिली.

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नालेसफाईची कामे सुरू आहेत. नालेसफाईची कामे ५० ते ५५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. आज कल्याण पूर्व चे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान पालिकेचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. पाहणी दरम्यान तुंबलेली गटारे व नाल्यामधील कचरा पाहून आमदारांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. आठवडाभरापूर्वी पाहणी केली होती तेव्हा सांगितलेली कामे आजतागायत का पूर्ण केली नाहीत असा सवाल आमदार गणपत गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना केला.

पुढील दोन ते तीन दिवसात नालेसफाईचे काम पूर्ण करा अशी तंबी देखील आमदारांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार गणपत गायकवाड यांनी नालेसफाईच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. नालेसफाई मे महिन्याच्या सुरुवातीला सुरू करायला पाहिजे होती मात्र उशिराने सुरू केली. यंदा हवामान खात्याने पाऊस लवकर पडणार सांगितलं मात्र असे असताना देखील अद्याप नालेसफाई पूर्ण झालेले नाही. ज्यांची सत्ता आहे त्यांच्याच पक्षातले ठेकदार आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर कुठलाही अंकुश नसल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: