
शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीला फुस लावून पळवले
टिटवाळा पोलिसांकडून कथित शिक्षक जेरबंद!
दिनेश जाधव : टिटवाळा
आठवी इयत्तेत शिकणार्या तेरा वर्षाच्या मुलीला खाजगी शिकवणी घेणार्या एका कथित शिक्षकानेच फूस लावून पळवून नेल्याची घटना टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. उशेश म्हणजे तब्बल वीस दिवसांनी पोलीस पथकाने रेल्वे पोलिसांच्या मदतीने दिल्ली येथील फरीदाबाद रेल्वे स्थानकावरून त्यांना ताब्यात घेतले.
ललित चौधरी असे शिक्षकाचे नाव आसून हा मूळचा बिहार येथील पटना येथील राहणारा आहे. टिटवाळा परिसरात हा खाजगी शिकवणी घेत असे. 1 मे रोजी 12 वर्षांची अल्पवयीन मुलगी सापडत नसल्याची तक्रार तिच्या पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर टिटवाळा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील यांनी याबाबत शोध मोहीम हाती घेत आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता त्याच परिसरात खाजगी शिकवणी घेणारा शिक्षक देखील बरेच दिसत नसल्याची बाब पोलिसांच्या कानावर आली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची पाऊले उचलली खरी मात्र ललित चौधरी वारंवार त्याचा मोबाईल बंद करत असल्याने लोकेशनचा शोध घेणे पोलिसांना कठीण जात होते. असता कथित शिक्षक ललित चौधरी आपला मोबाईल वारंवार बंद करीत असल्याने लोकेशन मिळणे कठीण होत होते. मात्र अखेर त्याचे मोबाईल लोकेशन फरीदाबाद रेल्वे स्टेशन दाखवित असल्याने फरीदाबाद रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून मुलीला पळवून नेल्या बाबतची माहिती दिली असता तेथील पोलिसांनी त्याला व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. त्यांनतर मुलीच्या वडिलांना सोबत घेत रविवारी सायंकाळी टिटवाळा पोलिस ठाण्याच्या पथकाने फरीदाबाद गाठले आणि आज मुलीला ताब्यात घेतले. २० दिवसानंतर अल्पवयीन मुलीला शिकवणीच्या बहाण्याने कथित शिक्षक ललित चौधरी याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकत ताब्यात घेतले आहे. दरम्यान टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलगी गायब होण्याच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आठवड्याभरात किमान दोन ते तीन घटना नियमित रजिस्टर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.