डोंबिवली मधील घटना, चोरी करणे बेतले जीवावर

डोंबिवली मधील घटना, चोरी करणे बेतले जीवावर

दिनेश जाधव : डोंबिवली

डोंबिवली खंबाळपाडा येथील केडीएमसी च्या बीएसयूपीच्या इमारतीत वायरिंग चोरी करण्यासाठी दोन तरुण गेले होते. मात्र वॉचमनला चोर शिरल्याचे लक्षात येताच तो इमारती मध्ये गेला. वॉचमन आल्याचे लक्ष्यात आल्याने घाबरलेल्या या दोघांनी इमारतीच्या पाईप वरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला.यामध्ये दोघे खाली पडले एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. मोहम्मद सलिम भाटकर अस या मयत तरुणाच नाव असून तो सराईत गुन्हेगार होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने शहरी गरिबांसाठी बीएसयूपी योजने अंतर्गत डोंबिवली व खंबाळपाडा परिसरात इमारती उभारल्या आहेत. मात्र अद्याप लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देण्यात आला नाही या इमारती भग्नावस्थेत उभ्या आहेत गेल्या काही दिवस महिन्यापासून या इमारतींना चोरट्यानी लक्ष्य केले आहे. या इमारतीच्या दरवाजे ग्रील चोर चोरून नेतात. या इमारतीमधील इलेक्ट्रिक वायरिंग चोरी करण्यासाठी अरफाह पिंजारी व मोहम्मद भाटकर हे दोन तरुण काल रात्रीच्या सुमारास गेले. हे दोघे इमारतीमध्ये शिरल्याचे वॉचमनला लक्षात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोघांनी घाबरून इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनवरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला यात हात निसटल्याने  मोहम्मद भाटकर व पिंजारी दोघे खाली पडले. यामध्ये मोहम्मद भटकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर पिंजारी जखमी झाला आहे याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भाटकर यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला मोहम्मद भटकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात या आधी देखील गुन्हे  दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: