
नोकरी लावतो तसेच मुल दत्तक देतो हा बहाणा दाखवून तीन लाखाची फसवणूक
दिनेश जाधव : कल्याण
नोकरी लावून देतो तसेच मुल दत्तक देतो त्या बदलत तुम्ही 3 लाख 50 हजार रुपये द्या असे आमिष दाखवून एका इसमची आर्थिक फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी येथे राहणाऱ्या जितेंद्र पाटील (३३) यांनी ठाणे येथे राहणाऱ्या २५ वर्षीय विशाल कुमार यादव यांना मुल दत्तक घेऊन देतो तसेच नोकरी लावतो असे सांगून जवळपास ३ लाख ५० हजार रुपयांना लुटले. यासंदर्भात गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यू. व्ही. जाधव करत आहेत.