ओएलएक्स ॲपचा वापर करताना एक लाखाचा घातला गंडा

ओएलएक्स ॲपचा वापर करताना एक लाखाचा घातला गंडा

खडकपाडा पोलीस ठाणे गुन्हा दाखल

दिनेश जाधव : कल्याण

घरातील व्यायम करण्यासाठी वापरण्यात येणारी सायकल विकण्यासाठी काढली. त्यासाठी ओएलएक्स ॲपवर तिचे फोटो टाकले मात्र त्यानंतर सायकल विकली जाण्याऐवजी खात्यातून 1 लाख 98 हजार 900 रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेंबुरला राहणाऱ्या राजीव कुमार मल्होत्रा या इसमाने विलास विजयराव सरदेशपांडे यांना फोन करून तुम्ही तुमच्या व्यायाम करणाऱ्या सायकलची फोटो ओएलएक्स वर टाकला आहे. ती सायकल मला खरेदी करायची आहे असे सांगितले. इतकेच नव्हे तर मी तुम्हाला पैसे पाठवतो असे सांगून सरदेशपांडे यांच्याकडून बँकेची माहिती घेतली. त्यानंतर एक लाख 98 हजार 900 रुपये ऑनलाईन इंटरनेट बँकिंग द्वारे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. सरदेशपांडे यांची आर्थिक फसवणूक केली. संदर्भात सरदेशपांडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक संदर्भात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे यशवंतराव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: