
रेल्वे पोलीस रोशन जाधव यांनी वाचवला प्रवाशाचा प्राण
दिनेश जाधव : कल्याण
आज दुपारी कल्याण स्थानकावर आलेली गोदान एक्स्प्रेस स्थानकावरून सुटत असताना एक जण गाडीला घासून पुढे येत असल्याचे लक्षात येताच फलाटावरील रेल्वे पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात येताच प्रसंगावधान राखत त्यांनी एका इसमाचे प्राण वाचवले.
उत्तरप्रदेश येथील मुस्तफाबाद सरेय्या सुलतानपूर येथे राहणारा पवन अशोक उपाध्याय हा ३३ वर्षीय तरुण गोरखपुरला जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेस मध्ये चढत असताना एक्सप्रेस सुरू झाली आणि काही कळण्याच्या आतच त्याचा पाय घसरला आणि ट्रेन समवेत तो घसपटत पुढे सरकला. याची कल्पना फलाटावर उभ्या असलेल्या रेल्वे पोलीस रोशन जाधव यांना आली. पवन घास पटत येत असल्याचे पाहताच रोशन यांनी तत्काळ पवन याला वरच्यावर उचलले. त्यामुळे पवन याला थोडे खरचटले असले तरी त्याचा जीव वाचला आहे. प्रकारानंतर रेल्वे पोलीस रोशन जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.