
मेलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्याला लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दिनेश जाधव : कल्याण
मेल गाड्यांमधील प्रवाशांचे मोबाईल फोन सर्रासपणे फोन चोरणाऱ्या एका इसमास अटक करण्यात कल्याण लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. पुणे येथे राहणाऱ्या या आरोपीकडून १ लाख २९ हजार ४८७ रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे ९ फोन हस्तगत करून ६ गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.
पुण्याला राहणारा शुभम सानप याने १७ मार्च रोजी सायंकाळच्या ६.३० च्या इंद्रायणी एक्स्प्रेस मध्ये
कल्याण ते पुणे प्रवास करणाऱ्या फिर्यादीचा मोबाईल कल्याण रेल्वे स्थानक येथे 10 हजार 500 रुपये किमतीचा मोबाईल चोरी केला. मोबाईल चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी 18 मार्च रोजी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. त्यानंतर शोध घेत असताना प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना गुप्त बातमी दाराकडून एक मोबाईल चोरणारा इसम कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महिला पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री पंढरीनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 5 एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. त्यानंतर शुभम याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अधिक चौकशी केली असता त्याच्या घरातून जवळपास एक लाख 29 हजार 487 रुपये किमतीचे 9 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहे.