
मानपाडा पोलिसांनी गांजा रॅकेट केला उध्वस्त
दिनेश जाधव : कल्याण
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देसले पाडा येथे अवैध अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक, साठा होत असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे एपीआय सुनील तारमाळे यांना मिळाली होती लागलीच मानपाडा पोलीस ऍक्टिव्ह मोडवर येऊन
मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी. श्री. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देसले पाडा ठिकाणी धाड टाकून पाच किलो 900 ग्रॅम वजनाचा गांजा एक एप्रिल रोजी हस्तगत करून दोन इसम मयूर जाडकर, अखीलेश धुळप यांना ताब्यात घेतले, पुढील तपास केला असता हा गांजा धुळे, शिरपूर येथून सूनील पावरा नावाच्या इसमाकडून आणल्याचं समजले, मानपाडा पोलिसांनी आपली टीम बनवून सूनील पावरा याला देखील शिरपूर मधून अटक करून 1 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत हस्तगत करून एक मोठे गांजा रॅकेट उघड केले.
हा गांजा उच्चशिक्षीत लोकांना विकत असावेत त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले.