रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या महिलेला रंगेहाथ पकडले

रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या महिलेला रंगेहाथ पकडले

दिनेश जाधव : कल्याण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे पाकीट चोरीला गेल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली. त्यानंतर या महिलेने ही बाब फलाटावर गस्त घालत असलेल्या पोलिसांना सांगताच सराईत पणे पाकीट चोरणाऱ्या एका महिलेस अटक केली आहे.
मानखुर्द पूर्व येथे राहणाऱ्या तान्हाबाई रावसाहेब पवार (42) या महिलेला चोरी करताना रंगेहाथ पकडले असून या महिलेचे नाव पोलिस रेकॉर्डवर असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. कर्जत येथे राहणाऱ्या दुर्गा ब्राह्मणे या दुपारी ठाणे येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. याचवेळी कल्याण स्थानकात गाडी पोहचली असता आपले पैशांचे पाकिट हरवले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्वरित फलाटावर गस्त घालत असलेल्या पोलिसांना त्यांनी सांगितले. यावेळी रेल्वे डबा तपासला असता रेकॉर्डवरील महिला आरोपी तान्हाबाई पवार त्यांना दिसल्या. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे हे ब्रह्मणे यांचे पाकीट सापडले. दरम्यान पवार यांच्यावर कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात देखील गुन्हा नोंद असल्याचे समोर आले आहे . कामगिरी प्रभारी अधिकारी, कल्याण रेल्वे पोलीस ठाणे अर्चना दुसाने, यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शलाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक भरसट, साळवे तसेच गुन्हे तपास पथकातील पोलीस हवालदार वानखेडे, आणि इतर कर्मचारी यांनी केली. अधिक तपास रेल्वे पोलीस अधिकारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: