
अवैध हत्यार बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक
– खडकपाडा पोलिसांची कारवाई
दिनेश जाधव : कल्याण
खडकपाडा पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना शहाड येथील मोहने रोड परिसरात हत्यार जवळ बाळगणाऱ्या दोन इसमाना पोलिसांनी रंगेहात पकडले. दरम्यान त्यांच्याकडे असणारे दोन कोयते एक पिस्तुल सारखे दिसणारे राखाडी रंगाचे लायटर अशी हत्यारे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
कल्याण येथे राहणारा आणि कापडाचा व्यवसाय असणारा ३५ वर्षीय मोहम्मद गौस शेख, २५ वर्षीय मुसेब शेख आणि त्या दोघांचे इतर दोन साथीदार रात्री २ वाजता शहाड येथील मोहने रोड परिसरातील बदंरपाडा येथील सार्वजनिक रस्त्यावर हात्यारांसह उभे होते. यावेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार पेट्रोलिंग करत असणारे खडकपाडा येथील पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पवार आणि त्यांच्या समवेत असणारे पोलीस हवालदार तडवी यांच्या काहीतरी संशयास्पद असल्याचे लक्षात आले. त्यांनतर या इसमांनी चौकशी केली असता अवैधरित्या हत्यार बाळगल्याचे समोर आले आहे. या आरोपींवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खडक पाडा पोलीस करत आहेत.