उच्चशिक्षित चोराला एटीएम फोडताना रंगेहात पकडले

उच्चशिक्षित चोराला एटीएम फोडताना रंगेहात पकडले

– मानपाडा पोलिसांची कारवाई

दिनेश जाधव : डोंबिवली

बंद असणाऱ्या एटीएम मशिनच्या गाळ्यातून ड्रीलमशिनचा आवाज येत असल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लागलीच सतर्कता बाळगून चोरांना रंगेहात पकडले. असून महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील एटीएम मशीन तांत्रीक पध्दतीने फोडुन गुन्हे केले असावेत असा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे हा चोर उच्च शिक्षित असून तो सिस्को कंपनीत काम करत असल्याचे चौकशी दरम्यान सांगितले.

मध्य प्रदेश येथे राहणारा राहुल चोरडीया वय ३५ वर्षे यास अटक करण्यात आली असुन, त्याचेकडुन एटीएम फोडण्यासाठी लागणारे १४,३००/-रु चे साहित्य त्यात ड्रील मशीन, स्कु ड्रायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पिन, एमसील अशा वस्तु मिळुन आलेल्या आहेत. शनिवारी रात्री दोन वाजता मानपाडा सर्कलचे ठिकाणी असलेल्या ऍक्सिस बँकेचे एटीएमचे शटर हे बंद अवस्थेत होते. मात्र आतून कसला तरी आवाज येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. शटर ठोठावले असता अतून आवाज येणे बंद झाले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी हळूच शटर उघडल्या नंतर त्यांनी पोलिसांना धक्का देऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याची झडती घेतली असता त्याचेकडे असलेल्या काळया रंगाचे बॅगमध्ये एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहीत्य मिळुन आले, त्याने सदरचे साहित्य एटीएम मशिन तोडुन त्यातील पैसे चारेण्यासाठी जवळ बाळगले असल्याचे सांगितले. परंतु त्याचा चोरी करण्याचा सदरचा प्रयत्न पोलीसांचे सतर्कपणामुळे अयशस्वी झाला आहे. अधिक तपास उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: