हडपसर बॉम्ब प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा; उपचाराच्या पैशांसाठी हॉस्पिटलला लुटण्याचा प्लॅन करत यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब

हडपसर बॉम्ब प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा; उपचाराच्या पैशांसाठी हॉस्पिटलला लुटण्याचा प्लॅन करत यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब ठेवून संपूर्ण शहरात खळबळ उडवून देणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात महाराष्ट्र एटीएसला मोठे यश आले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर दबा धरून बसलेल्या एटीएसच्या पथकाने या आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी राठोड असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपी हा आझाद हिंद एक्सप्रेसने प्रवास करत होता. ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर आली असता, तो गाडीतून उतरत असतानाच आधीच सज्ज असलेल्या एटीएसच्या पथकाने त्याला चहुबाजूंनी घेरून ताब्यात घेतले. सध्या या आरोपीला नागपूर एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत सर्व माहिती दिली आहे.

पत्रकार परिषदेत माहिती सांगताना अमितेश कुमार म्हणाले, पोलीस तपासाच्या आधारावर आरोपी रेल्वेने नागपूरच्या दिशेने पळालेला आहे असं समोर आलं होतं, अकोला पोलिसांशी संपर्क करून त्यांना मूर्तिजापूर येथे त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो सापडला नाही, त्यानंतर नागपुरातील रेल्वे स्टेशनवर त्याला एटीएस पथकाने त्याला ताब्यात घेतलेले आहेत, आरोपीला पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे,शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलीस त्याला घेऊन पुण्यात पोहचतील, यामध्ये कोणताही दहशतवादी अँगल आलेला नाही, ती सर्व घटना त्याने एकट्यानेच केली होती, तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे. तपासातील पुढचे अपडेट आपल्याला वेळोवेळी देण्यात येतील, प्रथमदर्शनी तपासामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आल्यानंतर सर्व माहिती येईल, या प्रकरणातील जो आरोपी आहे त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्याच्या ठिकाणांवर झडती प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासात आरोपी एकटाच होता अशी माहिती समोर आली आहे, दहा तारखेला तो त्याच्या पर्सनल ट्रीटमेंट साठी तर हॉस्पिटलमध्ये गेला होता, असे प्रथमदर्शनी समोर आले आहे, तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व माहिती समोर येईल.

सीसीटीव्ही आधारे तपास करून आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे, त्याच्या घरात एक घड्याळ मिळालं जे बॉम्ब संबंधित होते, म्हणून संशय बळावला आणि ATS ने त्याला नागपूरमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. प्राथमिक तपसानुसार खंडणीसाठी त्याने हे कृत्य केलं होतं.१० तारखेला हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता पण पैसे नव्हते म्हणून त्याने हे कृत्य केलं. ऑनलाइन बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण त्यानं घेतलं होतं, युट्युब व्हिडिओ पाहून बॉम्ब बनवला होता अशी माहिती देखील पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

हडपसर बॉम्ब प्रकरणी आरोपीला नागपुरातून ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्याकडे डिजिटल घड्याळ आहे. एका ट्रेनमध्ये नागपूर कडे पळाला होता माहिती समोर आली होती. त्याला नागपूर रेल्वे स्थानकावर एटीएसने ताब्यात घेतले आहे. दहशतवादी अँगलमध्ये दिसत नाही, पर्सनल काही प्रॉब्लेम दिसत आहे. प्राथमिक स्तरावर सगळ्या तपास सुरू आहे, बॉम्ब होता पण त्यामध्ये स्फोटक पदार्थ काही नसल्याचे प्राथमिक तपास आहे. आरोपीचा कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास नाही. आरोपी एकटाच होता.१० मे ला तो हॉस्पिटलला काही ट्रीटमेंटसाठी गेला होता, त्याच्याकडे काही पैसे नव्हते, त्यामुळे अशा प्रकारचा एक प्लॅन केला असल्याचा संशय आहे. त्यांनी बनवलेला बॉम्ब मध्ये कुठलाही स्फोटक पदार्थ नव्हता. युट्युबवर पाहून त्यांनी हा बॉम्बसदृश्य वस्तू बनवण्याचं काम केल्याचं दिसत आहे. तो मुळचा सोलापूरचा आहे, मांजरी भागात त्याचे शॉप आहे, त्याच परिसर राहतो, फॉरेन्सिक रिपोर्ट येईल तेव्हा कळेल.मांजरीमध्ये कपडे आणि शु दुकान आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून बॉम्बसदृश्य वस्तू बनवण्याच्या वस्तू विकत घेतल्याचा समोर आलं आहे.१५ ते १७ लोकाचा या दरम्यान तपास सुरू आहे. हॉस्पीटल सुरक्षाबाबत आम्ही प्राधान्य देतो आहे, पोलिस काळजी घेत आहे. काही झाले तर पोलिस सक्षम आहे. खंडणी पैसे उपचारासाठी वापरणार होता, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याच्या तयारीत होता, त्यांनी खंडणी धमकी दिली नव्हती, अशी माहिती देखील अमितेश कुमार यांनी दिली आहे.

हडपसर बॉम्ब प्रकरणी आरोपीने अवघ्या ४०० रुपयात बॉम्ब सदृश वस्तू बनवली असल्याची पोलिसांची माहिती आहे. यात डिजिटल घड्याळ,चार पाईप,सेलो टेप, दोन वायर काळे आणि लाल,स्फोटक काही पदार्थ नव्हता असा बॉम्ब बनवला. आरोपीच्या घरी २ किलो गांजा मिळून आला आहे, त्याचा तपास ही केला जात आहे. आरोपी नागपूर मधून पुढे हावडा मार्गे नेपाळ जाणार होता त्या ठिकाणी आरोपीची बहिण नेपाळला राहते.तिकडे जाणार होता.भारतात इकडे उन्हाळा आहे म्हणून बहिणीला तिकडे येतो म्हटला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon