
कल्याणमधील कुप्रसिद्ध गुंड स्थानबद्ध
दिनेश जाधव : कल्याण
कोळसेवाडी पोलीसच्या हद्दीत राहत असणाऱ्या एका सराईत नामचीन गुंडास एमपीडीए अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तांनी स्थान बद्ध तेची कारवाई करून एक वर्षाकरिता त्याला पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.
कल्याण पूर्वेतील कुप्रसिद्ध गुंड आशिष प्रेमचंद पांडे (23) असे स्थानबद्ध केलेल्या गुंडाचे नाव असून त्याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न गैर कायद्याची मंडळी जमवून दंगा करणे दमदाटी तसेच मालमत्ते विषयी व अन्य अशा सात गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी कोळसेवाडी व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी शहरात दहशत पसरविणार्या व सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने त्यानुसार सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.