
ठेकेदार पैसे देत नसल्याने कामगारांना ठेवले डांबून
– खंडणीखोर अटकेत
दिनेश जाधव : कल्याण
ठाण्यातील नौपाड्यात राहणाऱ्या 34 वर्षीय ठेकेदाराकडून 10 लाखांची खंडणी उकळण्यासाठी कामगारांना डांबून ठेवून मारझोड करणाऱ्या खंडणी बहद्दरासह त्याच्या साथीदाराला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
ठाण्यातील नौपाडा परिसरात राहणाऱ्या विजय कदम आणि एस. जगताप असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात रेल्वे यार्ड संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे काम सुरू केल्यानंतर विजय कदम यांनी साईट वर येऊन पैशांची मागणी केली. काम बंद होऊन नुकसान होऊ नये म्हणून मॅनेजरने विजय कदम पाच हजार रुपये दिले होते. त्यानंतर विजय हा धमकावून पैशांची मागणी करत होता परंतु ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने विजय कदम व त्यांच्यासोबत असलेले तीन इसमांनी खंडणी वसूल करण्यासाठी कल्याणच्या रेल्वे यार या साईटवर काम करत असलेल्या कामगारांना आनंद वाडीतल्या रेल्वेच्या कॉटर्स मध्ये डांबून ठेवून मारहाण केली शिवाय दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली तसेच खंडणीची रक्कम न दिल्यास कामगारांचा बळी देण्याचीही त्यांनी धमकी दिली या संदर्भात एसबी काळा या कंपनीच्या माध्यमातून कल्याण पूर्व कडील रेल्वे संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शोध घेऊन आतापर्यंत दोघांना अटक केली आहे कल्याण कोर्टाने या दोघांना अधिक चौकशी करता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. डी डोके करत आहे