
सोन्याची चेन लांबविणाऱ्या दोघांना अटक
कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
दिनेश जाधव : कल्याण
वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने चोरून नेणाऱ्या चोरट्यास कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. संतोष तेलंगे असे या आरोपीचे नाव असून तो मोहने गावात राहणारा आहे.
या बाबत वृत्त असे की, पोलीस महात्मा फुले चौक परिसरात गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत असताना सुमारे १० ते १२ दिवसांपूर्वी कल्याणमधील एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन खेचून पळून गेलेला इसम हा कल्याणमधील सोनाराकडे सोने विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनार गल्ली याठिकाणी सापळा रचून संतोष तेलंगे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून १४.८०० ग्रॅम वजनाची ३५ हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन हस्तगत करून त्याला पुढील कारवाईसाठी बाजारपेठ पोलीस ठाण्यात देण्यात आलं आहे.
तसेच दुसऱ्या घटनेत फरार पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश साळवे हा कोळेगांव फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी अटक केली. सदर आरोपीला पुढील कारवाईकरीता महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या दोन्ही कारवाया कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे वपोनि किशोर शिरसाठ, पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कवडे, जमादार संजय माळी, हवा. विश्वास माने, बापूराव जाधव, उल्हास खंडारे, अनुप कामत, सचिन साळवी, महेश साबळे, श्रीधर हुंडेकरी, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, विजेंद्र नवसारे, राहुल यांनी केली.