
भाजपाच्या सोशल मिडियाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ला
दिनेश जाधव : डोंबिवली
भाजपच्या सोशल मीडिया सेलचे काम पाहणाऱ्या एका कार्यकर्त्यावर सकाळी १० वाजता शंकर मंदिराजवळ असणाऱ्या त्याच्या पेट शॉप मध्ये काम करत असताना दोन अज्ञात इस्मने डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ल केला आहे. या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्यान्या कार्यकर्त्यावर शास्त्री नगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ला झालेल्या कार्यकर्त्याचे मनोज कटके असे नाव असून हा भाजपचे सोशल मीडिया पाहतो. सध्या सेना आणि भाजप मध्ये शित युद्ध सुरू आहे. गेल्या आठवड्यात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सेनेचे नेते आणि कार्यकर्ते यंच्यावर विविध आरोप केले होते. यावेळी टीनी नगर विकास मंत्री आणि पालक मंत्री एकनाथ शिंदे हे झारीतले शुक्राचार्य असल्याचे म्हणत डोंबिवलीचा विकास त्यांनी थांबवला असल्याचा आरोप त्यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे डोंबिवली शहरात राजकीय खळबळ उडाली असतानाच हा हल्ला झाल्याने पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे नेमका हा हल्ला समाज माध्यमावर टाकण्यात येणाऱ्या पोस्टमुळे केला गेला का असा प्रश्न उपस्थित झाला असून रामनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून अज्ञात इसमांचा कसून शोध घेत असल्याचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले.