
पोलीस खात्यात काम करणाऱ्या पोलिसांच्या मुलावर हल्ला
– मुख्य सूत्रधार अमोल भंडारी अटक, तीन आरोपी फरार
दिनेश जाधव : कल्याण
मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलिसांच्या मुलावर भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कल्याण येथील विजय नगर येथे घडली. या संदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मुख्य सूत्रधार अमोल भंडारी याला पोलिसांनी अटक केली आहे.
अजित फुलचंद जाधव असे या तरुण मुलाचे नाव असून
अजितला कल्याण येथील मेट्रो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. अजित जाधव आणि त्याचे मित्र विजय नगर येथील एका ठिकाणी गप्पा गोष्टी करत बसले होते.अचानक अज्ञात तीन आरोपींनी अजितच्या पाठीवर आणि हातावर चॉपरने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. या संदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य सूत्रधार अमोल भंडारी याला अटक करण्यात आली आहे. आरोपी अक्षय मोरे,गणेश सानप,साहिल मोरे फरार असून अधिक तपास पोलीस करत आहेत.