
शेतातील हरभरा चोरून आणल्याचा आरोप करत एका कामगाराला बेदम मारहाण
कुऱ्हाडीने केली मारहाण ,दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण मधील उंबर्डे गावातील एका कामगाराला शेतातील हरभरा चोरल्याच्या रागातून कुऱ्हाड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे यात कामगार गंभीर जखमी झाला असून हा संपुर्ण प्रकार cctv मध्ये कैद झाला
या प्रकरणी खडक पाडा पोलीस ठाण्यात दोन शेतकऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात इमारतीच्या साईट वर काम करणाऱ्या कामगार गंगा सिंग हा आपल्या घरी हरबरा खात बसला होता शेतकरी नवनाथ लोखंडे आणि रोहित लोखंडे यांनी गंगावर आरोप करत आमच्या शेतातील हरभरा चोरून खात असल्याचा आरोप करत लाकडी दांडके आणि कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घालत असतांना गंगा ने हातावर घाव झेलत जीव वाचवला या मारहाणीचा संपूर्ण प्रकार cctv मध्ये कैद झाला आहे
कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.