
कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याने अवैध बंदुकीसह एकाला केली अडक
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने एका पिस्तुल तस्कराला फिल्मी स्टाईलने गजाआड केले. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस पथक या तस्करचा पाठलाग करत असताना त्याने पोलिसांना घाबरवण्यासाठी जमिनीच्या दिशेने गोळीबार केला. मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता मोठया धाडसाने या तस्कराचा पाठलाग करत त्याला पकडले. सुरज शुक्ला असे या तस्कराचे नाव असून तो मध्यप्रदेश येथे राहणारा आहे.
फिल्मी स्टाईल पाठलाग करताना गोळीबार
कल्याण बाजारपेठ पोलिसाना एक पिस्तूल तस्कर कल्याण पश्चिमेकडील लाल चौकी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बाजारपेठ पोलिसांच्या बाजार पेठ पोलीस ठाण्याचे एपिआय सुजित मुंडे ,घोलप ,पोलीस नाईक सचिन साळवी ,भीमराव बागुल ,बाविस्कर ,पोलीस हवालदार जातक ,अत्तार ,भोसले या पथकाने आज सकाळच्या सुमारास लाल चौकी परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी एक इसम संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी त्याला हटकले. मात्र पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग सुरु केला. मात्र पोलिसाचा पाठलाग सुरुच असल्याने पाहून त्याने पोलिसांना घाबरवण्यासाठी आपल्याजवळील पिस्तूलाने जमिनीवर गोळीबार केला . मात्र पोलिसांनी न घाबरता काही अंतरावर त्याच्यावर झडप घालत त्याला ताब्यात घेतले आहे.
2 पिस्टल 2 मॅगझीनसह 16 काडतुस जप्त
अटक तस्कराकडून 2 पिस्टल 2 मॅगझीन 16 काडतुस जप्त करण्यात आले आहेत. त्याने हे पिस्तुल कुणाला विकण्यासाठी आणले, कुणाकडून आणले ,आणखी काही पिस्टल याआधी विक्री केलेत का याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.