
आरपीएफ जवानाच्या समय सुचकतेमुळे प्रवाशाचा वाचला प्राण
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण स्थानकात एका प्रवाशाचा जीव वाचवल यामुळे आरपीएफ जवानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान गाडी पकडताना कोणतीही घाई करू नका असा संदेश देखील रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात येत आहे.
मुंबई एल. टी. टी.पटणा जनता एक्स्प्रेस सोमवारी दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांनी कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४ वर आली होती. या ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा ट्रेन मध्ये चढताना तोल गेला. यावेळी हा प्रवासी फलाट आणि ट्रेन मधील गॅप मध्ये पडत असतानाच आरपीएफ जवान सोहनलाल ईटाह यांनी समयसूचकता दाखवत त्या प्रवाशाचा जीव वाचवला आहे. त्यानंतर निघालेली एक्स्प्रेस गार्ड द्वारे थांबवून त्या प्रवाशाला पुन्हा त्या ट्रेन मध्ये सुखरूप बसवून दिले. त्या प्रवाशाचे नाव अद्यापही कळले नसून आर. पी. एफ सोहनलालचे सर्वत्र कौतुक होत आहे.