माय लेकीला मारहाण करत दागिने चोरून चोर पसार – माहेर पणाला आलेली लेक रुग्णालयात घेत आहे उपचार

माय लेकीला मारहाण करत दागिने चोरून चोर पसार – माहेर पणाला आलेली लेक रुग्णालयात घेत आहे उपचार

दिनेश जाधव : कल्याण

गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने माहेरपणाला आलेल्या मुलीला आणि आईला घरात घुसून मारहाण करत घरातील १३ तोळयाचे दागिने आणि काही रोकड घेऊन चोर पसार झाल्याची खळबळजनक घटना कल्याण येथील खडकपाडा परिसरात घडली आहे. खडकपाडा पोलीस या घटनेचा तपास करत असून माय लेकीवर खजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याण डोंबिवलीत घरफोडी, वाहन चोरी, चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली असून चोरीचे सत्र सुरू आहे. माघी गणेश उत्सवासाठी माहेरपणाला आलेल्या लेकीला आणि आईला चोरट्यांनी बेदम मारहाण करत घरातील दागिने लुटले आहेत. कल्याणनजीक आटाळी मानी या गावात ही घटना घडली आहे. या गावात राहणाऱ्या वत्सला चिकणो यांच्या घरी त्यांची विवाहीत मुलगी सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत माघी गणपतीच्या निमित्ताने माहेरपणाला आली होती. काल रात्री गणोश विसजर्नानांतर आई – मुलगी आणि तिची दोन मुले घरात झोपले असताना मध्यरात्री घरात कोणीतरी शिरले असल्याचे आईच्या लक्षात आले. मात्र तिने आरडाओरड करण्याआधीच तिच्या डोक्यात चोरटय़ांनी हल्ला केला. या सगळ्या प्रकारात मुलीला जाग आली तिने चोरांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली. मात्र तिला देखील चोरांनी मारहाण केली. त्यांनतर घरातील दागिने आणि रोकड घेऊन ते पसार झाले. घरात घूसून दोन महिलांना जखमी करुन लूटमारीच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. खडकपाडा पोलीसांना याची माहिती देण्यात आली. खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असून अधिक तपास करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: