
समाज सुरक्षा आणि देशसुरक्षे साठी लावा १ कॅमेरा
– कोळसेवाडी पोलिसांचे आवाहन
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण डोंबिवलीतील वाढत्या गुन्ह्याची दखल घेऊन कोळसेवाडी पोलिसांनी दुकानदारांनी सामाजिक सुरक्षा आणि देशांतर्गत सुरक्षेसाठी आपल्या दुकानाबाहेर सी सी टीव्ही लावून घ्यावे असे आवाहन केले आहे. यामुळे तुमच्या आजूबाजूचा परिसर सुरक्षित राहील आणि मोठ्या प्रमाणात होत असणाऱ्या गुन्ह्याची उकल करणे सोपे जाईल असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे १ कॅमेरा समाजासाठी आणि देशासाठी असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोना नंतर बेरोजगारी वाढली आहे. कल्याण डोंबिवलीत चोरी, खून , दरोडे याचा घटना वाढत आहेत. या गुन्ह्याची उकल बऱ्याच वेळा सी सी टिव्ही कॅमेराद्वारे करणे सोपे जाते. अनेक ठिकाणी महापालिका आणि प्रशासनाने सी सी टिव्ही कॅमेरा लावले आहेत. असे असले तरी हे कॅमेरा कमी पडत असून अधिकाधिक कॅमेरे लावण्याची गरज आहे. मात्र या कॅमेराचा खर्च अधिक असल्याने प्रशासनावर भार येतो. त्यामुळे दुकानदारांनी पोलीस आणि प्रशासनाला मदत करण्यासाठी कॅमेरा रस्त्यावर लावला तर गुन्ह्याची उकल करण्यास मदत होईल असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कऱ्हाळे, उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश मानेपाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख आणि कोळसे वाडी पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी करत आहेत. गल्ली सुरक्षित असेल तर शहर सुरक्षित राहत त्यानंतर जिल्हा सुरक्षित होती त्यानंतर राज्य सुरक्षित होत आणि त्यानंतर देश सुरक्षित होतो. त्यामुळे देश आणि आपण सुरक्षित राहण्यासाठी दुकानाबाहेर एक तरी कॅमेरा लावा असे सांगण्यात आले आहे.