
केडीएमसी कर्मचार्याच्या पत्नीने मैत्रिणी सोबत सुरू केला चोरीचा धंदा
सीसीटीव्ही च्या साह्याने दोन्ही महिलांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दिनेश जाधव : डोंबिवली
केडीएमसी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पत्नीचं चोर निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महागड्या साड्या आणि चांगल्या दागिन्यांची हौस भागवण्यासाठी बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांच्या हातातील पर्स ती चोरी करत होती. इतकेच नव्हे तर या महिलेने स्वतःच्या मैत्रिणीला देखील यात सामील करून घेतले. कल्याण क्राइम ब्रांचणे सीसीटीव्ही च्या साहाय्याने आरती पाटील हिला अटक केली आहे.
कल्याण डोंबिवलीत चैन स्नेचिंग घरफोडी बाईक चोरीचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. यात आणखी एक गुन्हा घडत होता. तो होता बाजारात गर्दीच्या ठिकाणी महिलांची पर्स चोरी करून अज्ञात चोरटा पसार होत होता. कल्याण क्राईम ब्रांच पोलीस या चोरट्याच्या शोधात होते. कल्याण क्राइम ब्रांचचे पोलीस अधिकारी भूषण दायमा, पोलीस निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस कर्मचारी विनोद चन्ने, किशोर पाटील यांच्या पथकाने कल्याण डोंबिवलीतला बाजारात गर्दीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून पाहिले एका ठिकाणी एक महिला सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. जवळपास दोन महिने पोलीस या महिलेच्या शोधात होते. क्राइम ब्रांचचे पोलीस कर्मचारी विनोद चन्ने यांच्या गुप्त माहितीच्या आधारावर या महिलेची ओळख पटली. सदर महिला डोंबिवलीच्या टीएमटी कॉलनी परिसरात राहत असल्याची माहिती मिळताच क्राइम ब्रांच पोलिसांनी या महिलेच्या घरात जाऊन तिला बेड्या ठोकल्या या महिलेच्या अटकेनंतर जी माहिती समोर आली ती ऐकून पोलीस हैराण झाले. आरती चे पती केडीएमसी मध्ये कर्मचारी आहेत ती एका संपन्न परिवारातील आहे. तिला चोरी करून पोट भरण्याची आवश्यकता नाही मात्र तिला महगड्या साड्या, महागडे दागिने, मोठं मोठ्या हॉटेल मध्ये जेवण करण्याची हौस होती. हीच हौस पूर्ण करण्यासाठी तिने चोरीचा मार्ग पत्करला. बाजारात गर्दीच्या ठिकाणी खरेदीसाठी आलेल्या महिलांवर नजर ठेवायची आणि वेळप्रसंगी त्यांच्या पर्स ला ब्लेड मारून पर्स चोरी करून पळून जायची. कल्याण क्राइम ब्रांचने आरतीला ताब्यात घेत कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. त्यानंतर महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, आरती सोबत तिची एक मैत्रीण पण होती जी अशाच प्रकारे चोरी करायची. शालिनी पवार नावाच्या या महिलेला सुद्धा महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली.
याबाबत कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी सांगितले या 2 महिलांकडून आजपर्यंत 9 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून जवळपास 15 तोळे हस्तगत करण्यात आला असून 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.