
देशभरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे करणारा चोर गजाआड
– मानपाडा पोलिसांची कारवाई
दिनेश जाधव : डोंबिवली
पाच वर्षापासून फरार असलेला आणि मोक्का लागलेल्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात मानपाडा पोलिसांना यश आले असून. या गुन्हेगारावर कल्याण डोंबिवलीसह ठाणे , भिवंडी, नवी मुंबई, पनवेल, सातारा पुणे तसेच कर्नाटक मधील बेंगलोर अशा विविध पोलिस स्थानकात मोटार सायकल, मोबाईल आणि दागिने चोरी या संदर्भातील 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान मानपाडा पोलीस स्थानकात गेल्या तीन महिन्यात मोटर सायकल चोरी प्रकरणातील १३ आरोपी पकडले असून यामुळे जवळपास ५० गुन्ह्याची उकल झाली आहे. या सर्वांकडून जवळपास २२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आंबिवली येथील इराणी वस्तीत हसनेन गुलाम सैय्यद उर्फ इराणी हा २८ वर्षांचा आरोपी फिरत असल्याची माहिती मानपडा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कोंबिंग ऑपरेशन करून त्यांनी आरोपीला अटक केली असून त्यांनी संपूर्ण देशात विविध ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून ०२ मोबाईल ०२ मोटार सायकल, ३० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २,६१,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तर इतर ५० गुन्ह्यातील एकूण १३ आरोपीना अटक करण्यात आली असून, त्यांचेकडुन २१,६४,५००/- रु किमतीच्या ४३ मोटार सायकली, ६ रिक्षा व २३ मोटार सायकलचे इंजिनचे पार्ट हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी.मोरे, यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि शेखर बागडे, सपोनिरी अनिल भिसे, पोऊनिरी, सुनिल तारमळे आणि इतर सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.