आरटीओ कार्यालया आवारातील टपर्यावर पालिकेची धडक कारवाई

आरटीओ कार्यालया आवारातील टपर्यावर पालिकेची धडक कारवाई

कारवाईच्या पूर्वीच टपऱ्या गायब

दिनेश जाधव : कल्याण

कल्याणच्या आरटीओ कार्यालयाला अनधिकृत टपऱ्यानी विळखा घातला असून आरटीओ संबधित कामे करण्याचा दलालांचा मोठ्या प्रमाणावर आरटीओ कार्यालयात वावर असतो त्यातूनच गेल्या महिन्यात आरटीओच्या कर्मचाऱ्याला मारहाणीचा प्रकार घडला होता.आरटीओ कार्यालयाच्या आवारात बेकायदेशीर पणे थाटलेल्या टपर्यावर पालिकेने बुधवारी धडक कारवाई सुरुवात करण्या पूर्वीच टपरी धारकांनी आपली टपऱ्या घेऊन पळ काढला तर उरलेल्या दोन तीन टपर्यावर पालिकेने कारवाई करीत जप्त केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली .
कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज मधील परिवहन प्रादेशिक कार्यालयांच्या आवारातील फूटपाथ वर गेल्या काही महिन्या पासून राजकीय पक्षांच्या पदाधिकार्याच्या आशीर्वादाने ३० ते ४० बेकायदेशीर अनधिकृत टपऱ्याधारकांनी धाटल्या आहेत या बेकायदेशीर टपरीधारकाना ना आरटीओची ना पालिकेची भीती असल्याने या टपरी धारकांची दादागिरी वाढली आहे या बेकायदेशीर टपऱ्या मधूनच आरटीओ संबधित परवाने व नूतनीकरण करण्याची कामे आरटीओ चे दलाल करत असतात .गेल्याच महिन्यात या टपऱ्या मधील एका दलालाने आरटीओचे कर्मचारी मनीष जाधव याला क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मारहाण केली होती .या मारहाणी मुळे आरटीओ कार्यालया बाहेरील बेकायदेशीर टपर्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता .या बेकायदेशीर तपर्याच्या कारवाईसाठी आरटीओ कार्यालयाच्या कर्मचर्यानी कारवाईची मागणी।केली होती. तसेच या बेकायदेशीर टपर्‍या मुळे येण्या जाण्यास वाहतुकीची अडथळा निर्माण केला  होतअसल्याने या टपर्यावर कारवाई साठी माहिती अधिकार कार्यकर्ता चंद्रमणी उपाध्याय यांनी या विषयी पालिकेच्या ब प्रभाग क्षेत्र कार्यालया कडे तक्रार केली होती  या तक्रारी नुसार अतिक्रमण ब” कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी आपल्या पथकासह ३० ते ४० अतिक्रमानावर धडक कारवाई साठी जेसीबी पोलीस फाटा आणि कर्मचारी गेले असता त्यापूर्वीच

टपरी धारकांनी आपली टपऱ्या घेऊन पळ काढला तर उरलेल्या दोन तीन टपर्यावर पालिकेने कारवाई करीत टपऱ्या जप्त केल्या सदरची कारवाई करताना कर्मचारी बाळू शिंदे म्हात्रे , शेवाळे महालेआणि पथक कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: