अखेर शिवसेना आयोजित डोंबिवली आगरी मालवणी जत्रा उत्सव रद्द

अखेर शिवसेना आयोजित डोंबिवली आगरी मालवणी जत्रा उत्सव रद्द

दिनेश जाधव : डोंबिवली

डोंबिवली : पश्चिमेकडील कान्होजी जेधे (भागशाळा) मैदानात शिवसैनिक प्रकाश तेलगोटे यांनी १ तारखेपासून आगरी मालवणी जत्रा उत्सव आयोजित केला आहे. सदर उत्सव शिवसेना आयोजित असल्याने मोठी गर्दी उसळली होती. उत्सवात एक हजार पेक्षा जास्त नागरिक एकावेळी गर्दी करत असल्याने आयोजकाने शासनाच्या नियमाचे मोडल्याची दाखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आयोजकांवर विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परिणामी
शिवसेना आयोजित डोंबिवली आगरी मालवणी जत्रा उत्सव रद्द करीत असल्याचे प्रसिद्धीपत्रक शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश टेलगोटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

या जत्रा उत्सवामध्ये शासनाच्या नियमांचे उलंघ्घन करून २५० पेक्षा जास्त लोक, विनामास्क, सोशल डीस्टसिंगचे पालन न करणे तसेच जिल्हाधिकारी, ठाणे शहर पोलीस आयुक्त यांचे मनाई आदेशाचे उलंघ्घन केलेले असून कोरोना आणि ओमाक्रोन संबंधी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आल्याने विष्णूनगर पोलीस ठाणे पोलिसांनी गु.र.नं. सस २/ भा.द.वि.कलम २६९,२७०,२७१,१८८,सह महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना २०२० चे कलम ११ व साथीचे रोग प्रतीबंधक कायदा १८९७ चे क्र.३ आणि आपत्ती व्यवस्थापक आधी.२००५ चे क्र.५१ (ब) प्रमाणे तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच कार्यक्रमाची परवानगी रद्द करण्यात आला असून. आगरी मालवणी जत्रा उत्सव २०२१ कर्यक्रमाची दिलेली परवानगी त्वरित रद्द करण्यात आली आहे. तसेच मैद्नातील स्टॉल आणि साहित्य दोन दिवसात काढून मैदान रिकामे करावे असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत.

याबाबत टेलगोटे यांनी सांगितले की, भागशाळा येथील उत्सव रद्द करण्यात आला आहे. मैदानात यापुढे शिवसेना तसेच माझा काहीही संबंध असणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: