लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या उच्च शिक्षित गृहिणीने निवडला ‘हा’ पर्याय

लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या उच्च शिक्षित गृहिणीने निवडला ‘हा’ पर्याय

दिनेश जाधव : कल्याण

कल्याण : लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या एका उच्च शिक्षित गृहिणीने नोकरी न करता बँकेतून कर्ज घेऊन एक टेम्पो खरेदी करीत त्यावर आपल्या बुद्धीचा वापर करीत जिद्दीच्या जोरावर चालता फिरता मंडप (स्टेज) उभा करून कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून हा पर्याय निवडल्याचे सांगितले आहे. अश्विनी संतोष जाधव (वय ३४) असे या गृहिणीचे नाव असून ती कल्याण पूर्वेतील विजयनगर भागात कुटूंबासह राहते.

बँकेकडून ६ लाख रुपये कर्ज घेऊन खरेदी केला मिनी टेम्पो

कोरोना काळात केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे देशभरात सर्व व्यवसाय ठप्प होऊन लाखो कुटूंब यामुळे कर्जबाजारी झाले. तर हजारो नागरिकांच्या नोकऱ्या जाऊन बेरोजगार झाले. त्यामध्ये उच्च शिक्षित गृहिणी अश्विनी यांचे कुटूंबही कर्जबाजारी झाले. त्यातच पतीच्या पगारावर घर खर्च भागवणे जिकरीचे झाले. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. मात्र खचुन न जाता एक तर नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय निवडण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी व्यवसायासाठी एका बँकेकडून ६ लाख रुपये कर्ज घेऊन एक मिनी टेम्पो खरेदी केला. या टेम्पोवर आणखी १ लाख रुपये खर्च करून त्याला मंडप (स्टेज) चे स्वरूप दिले.

केवळ २० ते ३० मिनिटांत टेम्पोचा स्टेज 

या टेम्पोचा उपयोग छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी स्टेज म्हणून वापरता येईल, शिवाय केवळ २० ते ३० मिनिटांत टेम्पोचा स्टेज केला जातो. आजच्या घडीला मंडप अथवा स्टेजचा खर्च सर्व सामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे या टेम्पोचा स्टेज स्वतः दरात त्यांनी कार्यक्रम करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिला. टेम्पोचा स्टेज ११ बाय १७ असून यावर छोट्या सभा सभारंभ होऊ शकतात असे अश्विनी यांनी सांगितले. तसेच अनेक सर्व सामान्य कुटूंबाना विविध कार्यक्रम करताना खर्चामध्ये बचत करणारी हि संकल्पना असून यापासून आमच्या कुटूंबालाही उपजिविकेचे साधन मिळाल्यानेही सांगितले. एकंदरीतच एका उच्च शिक्षित गृहिणीने खचून न जाता कुटूंबाला हातभार लावण्यासाठी जो पर्यायी निवडला त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: