सराईत चोरट्याला कोलशेवाडी पोलिसांनी केली अटक साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सराईत चोरट्याला कोलशेवाडी पोलिसांनी केली अटक साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

दिनेश जाधव : कल्याण

कल्याण कोलशेवाडी पोलीसानी एका सराईत चोरट्याला सापळा रचत अटक केली आहे .अलिहसन जाफरी अस या चोरट्याच नाव आहे .22 वर्षीय आलिहसन हा सराईत गुन्हेगार आहे .चैन स्नेचिंग व दुचाकी चोरी मध्ये त्याचा हातखंडा आहे .चैन स्नेचिंग करण्यासाठी तो आधी महागड्या दुचाक्या चोरायचा त्यानंतर या चोरलेल्या दुचाकीवरून चैन स्नेचिंग करायचा व ही दुचाकी रस्त्यात उभी करून तेथून पळ काढायचा .कल्याण कोलशेवाडी परिसरात चैन स्नेचिंग ,दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या . या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिसांनी चार पथके नेमली व या चोरट्यांचा शोध सुरु केला .खबऱ्यां मार्फत त्यांना अलीहसन हा आंबिवली इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा लावून अलीहसनला अटक केली त्याच्याकडून पाच मोटरसायकल तीन साखळ्या 4 लाख 53 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलाय आतापर्यंत कल्याण-डोंबिवली भिवंडी , ठाणे मुंबई या ठिकाणी देखील चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत . दरम्यान दरम्यान कल्याण नजीकच्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून या आधी देखील अनेक सोनसाखळी चोरट्यांना अटक करण्यात आली आहे .अलीहसनच्या अटकेनंतर ही वस्ती पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आली आहे .

सदरची कामगिरी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हेप्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी पार पाडल्यामुळे सदर कामगिरीबाबत अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे सो पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, तसेच पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ सो परिमंडळ ३ कल्याण, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील सो. कल्याण विभाग, कल्याण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशिर के. शेख सो कोळसेवाडी पोलीस स्टेशन यांनी नमुद पोलीस अंमलदार यांची प्रशंसा केली .

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: