
कल्याण शहरात धुमाकुळ घालणारा अट्टल घरफोडयाला बाजारपेठ पोलीसांनी केले जेरबंद
१५ तोळे सोन्याचे दागीने हस्तगत
दिनेश जाधव : कल्याण
मागील वर्षभरापासुन कल्याण शहरात दिवसा तसेच रात्रौचे वेळेस घरफोडयांचे सत्र सुरूच होते. कल्याण शहराचे नागरीक त्रस झाले असल्याने कल्याण शहरातील पोलीसांपुढे मोठे संकट निर्माण झालेले होते. घरफोडयांचे सत्र थांबिवणे करीता व घरफोडी करणारे इसमास जेरबंद करणे करीता वरिष्ठ पोलिसांनी कल्याण शहराचे पोलीस अधिकार्यांना योग्य त्या सुचना दिलेल्या होत्या.
७ डिसेंबर रोजी बाजारपेठ पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे या गुन्हयाचा बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार तपास करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे शिताफिने सापळा रचुन 11 डिसेंबर रोजी आरोपी आरोपीला अटक केली. गणेश प्रभाकर शिंदे (वय ४० वर्षे) असे नाव असून तो बनेली टिटवाळा पूर्व येथे राहत होता. त्याला त्याचा राहत असलेल्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने कल्याण शहारात जानेवारी २०२१ पासुन त्याचे साथीदार सिकंदर उर्फ किरण रमणीक शहा मुन्ना यांचेसह एकुण ४ ठिकाणी दिवसा व रात्रीच्या वेळेस बंद घरांचे दरवाजाचे कड़ी कोयंडा तोडुन घरांमधिल सोन्याचे दागीने तसेच रोख रक्कम चोरी केल्याचे कबुल केले आहे. आरोपीकडुन सुमारे ०२,२५,००० रुपये किंमतीचे एकुण १५ तोळे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले आहेत.