विष्णुनगर पोलीसांनी दोन सराईत मोटारसायकल चोरांना केले जेरबंद, 9 मोटारसायकल हस्तग

विष्णुनगर पोलीसांनी दोन सराईत मोटारसायकल चोरांना केले जेरबंद, 9 मोटारसायकल हस्तगत

दिनेश जाधव : डोंबिवली

विष्णुनगर पोलिसांनी दोन सराईत मोटारसायकल चोरांना जेरबंद करण्यात यश मिळाले असून, त्यांच्याकडून चोरी केलेल्या 9 मोटरसायकल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. दिलीप शांताराम पाटील (25) आणि रोहित अविनाश यादव (31) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ रोडवरून 4 नोव्हेंबर रोजी सकाळी एक मोटर सायकल चोरी झाली होती. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू होता. त्याच बरोबर अन्य भागातून मोठ्या प्रमाणात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याने गुन्हयाचा तपास करण्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहा पोलीस निरीक्षक गणेश वडणे व त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. प्रथम घटनास्थळाच्या परिसरातील सी. टी. व्ही. कॅमेरे तपासले असता दोन इसम गुन्हयात चोरीस गेलेली मोटारसायकल ढकलत घेवून जात असल्याचे दिसुन आले. नमुद् इसमांची गुप्त बातमीदारांमार्फतीने ओखळ पटवून दिलीप पाटील याला तांत्रिक विश्लेषनाच्या सहायाने त्यांचे ठिकाण बदलत असताना व शेवट मोबाईल बंद असताना कौशल्यपुर्ण तपास करुन जळगाव परोळा येथुन ताब्यात घेतले. तर त्याचा दुसरा रोहित यादव याला कल्याण पूर्व चिंचपाड येथून ताब्यात घेतले. त्यांनी पोलिसी चौकशीअंती नमूद वरील गुन्हा केल्याची कबुली करुन मोटारसायकल हस्तगत केली तसेच आरोपी  दिलीपने विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी 5 मोटारसायकल चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्याकडुन त्या हस्तगत केल्या आहेत. तसेच त्याच्याकडुन आणखी 3 मोटारसायकल अशा एकूण 9 मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. तर आरोपी रोहित याने दिलीप सोबत एका गुन्ह्या मोटारसायकल चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: