
टपाल विभागाने दोन दिवसीय सुकन्या योजना सुरू केली आहे
शिबिरात आधार कार्ड आणि खाते उघडण्यास चांगला प्रतिसाद
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण- कल्याणच्या वायलेनगरमध्ये टपाल विभागाने दोन दिवसीय सुकन्या योजना सुरू केली आहे. टिळक चौक, टपाल विभागाच्या मुख्य कार्यालयच्या माध्यमातुन या शिबिराचे आयोजन करन्यात आले. आधार कार्ड आणि खाते उघडण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी स्थानिक माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या सहकार्याने वरिष्ठ डाक अधीक्षक एस.व्ही. व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोस्टमास्तर प्रदीप मुंधे, पीआरआय (प्र) शुभांगी गांगुर्डे, एमई संदीप जाधव, एस.ए.मिलिंद गांगुर्डे, नीलेश सोनवणे, योगेश चोरघे व आदेश गायकर तसेच पोस्ट विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात सुकन्या योजनेसह आधार कार्डासंबंधीच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. याशिवाय विभागाकडून लोकांची नवीन खातीही उघडण्यात आली. वरिष्ठ डाक अधीक्षक एस.व्ही.वहारे यांच्या आदेशानुसार कल्याण शहराचे पोस्टमास्तर प्रदीप मुंढे यांनी शिबिरात मार्गदर्शन करून लोकांना सुकन्या योजनांची सविस्तर माहिती दिली.