
पोलीसांच्या रखवालीतुन पळून गेलेल्या गुन्हेगारास दादरा नगर हवेली मधुन अटक, मानपाडा पोलीस स्टेशन ने केली अटक
दिनेश जाधव : कल्याण
३७९, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयात मानपाडा पोलीस स्टेशनने अटक केलेला आरोपीत नामे राजकुमार कृष्णा बिंद वय ३० वर्षे रा. पांडुरंग चाळ रूम नं. १७. सेवन स्टारचे मागे गोलवली गाव, डोंबिवली पूर्व मुळ रा. मिर्झापुर राज्य उत्तरप्रदेश यास अटक केले नंतर तो कोव्हीड पॉझीटीक झाल्याने त्यास उपचाराकरीता कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील टाटा आमंत्रण या बिल्डींगमध्ये पोलीस रखवालीत अडमीट केले होते. सदर आरोपी हा कोव्हीड १९ ये उपचार घेत असतांना १० मे २०२१ रोजी पळून गेला होता. त्यामुळे कोनगाव पोलीस ठाणे येथे त्याचेवर गु.र.नं. १२७/२०२१ भादवि कलम २२४,१८८ २६९ २७०, महाराष्ट्र कोव्हीड १९ विनीमयन २०२० चे कलम ११, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब) साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २, ३, ४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून मानपाडा पोलीस व कोनगांव पोलीस त्याचा पाठलाग करीत होते. परंतु तो त्याची वास्तव्याची/कामाची ठिकाणे वांरवार बदलत होता.
अशा फरारी आरोपीचा मानपाडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तांत्रीक तपासाचे आधारे शोध घेवून त्यास आज दिनांक १३/१२/२०२१ रोजी दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशाची राजधानी असलेल्या सिल्वासा शहरामधुन अटक केली आहे.
सदरची कारवाई सचिन गुंजाळ, पो उप आयुक्त, परी ३, कल्याण, जे.डी.मोरे, सपोआ/ डोंबिवली विभाग, वपोनिरी/ शेखर बागडे, पोनि / बाळासाहेब पवार (गुन्हे), पोनि / सुरेश मदने यांचे मार्गदर्शनाखाली, अविनाश वनवे, राजेंद्र खिलारे, कोळी, दिपक गडगे, भारत कांदळकर, प्रविण किनरे, पवार, यलप्पा पाटील, महेंद्र मंझा, धर्मा पवार, सुनील महाजन यांनी केली आहे.