
कल्याण मध्ये धक्कादायक घटना किरकोळ कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने वार
दिनेश जाधव : कल्याण
भाई बोलला नाही म्हणून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली आहे.
अक्षय भालेराव आणि त्याचे मित्र शनिवारी रात्री एका ढाब्यावर पार्टीसाठी गेले होते आपसात वाद सुरू असतांना बाजूला विजय शिंदे आणि रवि वाघे हे उभे होते यांच्या सोबत वाद होऊ नये म्हणून अक्षयने मित्राला बाजूला केले त्यावेळी अक्षय भालेराव याने विजय शिंदेला विजय असा एकेरी उल्लेख केला. तसेच वाद नकोत असे बोलून मित्राला बाजूला केले. याचा राग मनात धरून विजय शिंदेने रात्री अक्षयला रस्त्यात आडवून मला विजय का बोलला भाई बोलता येत नाही का याचा जाब विचारला आणि अक्षयला मारहाण केली. त्यावेळी अक्षयने त्याचा भाऊ विशाल भालेरावला फोनद्वारे घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून घटना स्थळी आलेल्या विशाल भालेराववरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
या प्रकरणी कल्याणचया बाजारपेठ पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून 2 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर बाकी आरोपींचा शोध सुरू केला आहे.