
ट्रेनमध्ये नवजात बाळाला सोडणा:या महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा
कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचची कारवाई
दिनेश जाधव : कल्याण
डोंबिवलीत राहणा:या एका महिनेने तिचे नवजात बाळ टिटवाळा रेल्वे स्थानकात ट्रेन मध्ये सोडून पळ काढला होता. कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने या महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती.
20 नोव्हेंबर रोजी टिटवाला रेल्वे स्थानकात ट्रेन मध्ये एका पिशवीत नवजात बाळ आढळून आले होते. कल्याण जीआरपीने या प्रकरणी भादवी 317 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाचा तपास कल्याण जीआरपी सह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचही तपास करीत होते. हा तपास करीत असताना क्राईम ब्रांचने सर्व स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. कोपर रेल्वे स्थानकातून एक महिला स्थानकात बसली होती. तिच्या हाती एक पिशवी होती. ज्या पिशवीत ते बाळ सापडले. ती पिशवी आणि महिलेच्या हातातील पिशवी सारखीच दिसून आली. तिच महिला असावी अशी पोलिसांना शक्यता होती. याच शक्येतेच्या आधारे पोलिसांनी तपास केला. या महिलेचा पोलिसांनी पत्ता शोधून काढला. ही महिला डोंबिवलीच्या देवीच्या पाडा परिसरात राहणारी आहे.
या बाबत कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलिस अधिकारी अशरद शेख यांनी माहिती दिली आहे की, या महिलेचे एका विवाहिती पुरुषासोबत संबंध होते. त्या महिलेला त्याने घर घेऊन दिले होते. त्यांच्या दोघातील्अनैतिक संबंधामुळे तिने बाळाला जन्म दिला. हे बाळ नकोसे झाल्याने तिने बाळाला रेल्वे ट्रेनमध्ये सोडले होते. यात तिच्या प्रियकरांचाही समावेश होता. पोलिसांनी या दोघांना बेडय़ा ठोकल्या आहेत.