क्षुल्लक कारणावरून आरटीओच्या कल्याण विभागीय कार्यालयाच्या क्लार्कला मारहाण

क्षुल्लक कारणावरून आरटीओच्या कल्याण विभागीय कार्यालयाच्या क्लार्कला मारहाण

दिनेश जाधव : कल्याण

कल्याण :- क्षुल्लक कारणावरून आरटीओच्या कल्याण विभागीय कार्यालयाच्या क्लार्कला ऑन लाईन फॉर्म भरणाऱ्या एका एजंटने आपल्या तीन ते चार साधीदाराना बोलून क्लार्क कामावरून सुटल्यावर घरी जात असताना प्रवेशद्वारावरच पकडून मारहाण केल्याचा घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली .शासकीय कर्मचार्यावर वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या घटनेमुळे आरटीओ कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरटीओच्या कल्याण विभागीय कार्यालयाच्या लगत असलेल्या भिंतीला चिटकून असलेल्या फूटपाथ वर बेकायदेशीर पणे टपऱ्या उभारल्या गेल्या असून या टपर्या मध्ये झेरॉक्स, ऑनलाइन फॉर्म भरण्याची दुकाने थाटली आहेत. बेकायदेशीर टपरी दुकान थाटून त्याच्यात ऑनलाइन फॉर्म भरण्याचे काम करणारा एजंट मचिंद्र केणे आरटीओ कार्यालयात काहींकाम निमित्त गेला होता व त्याने क्लार्क मनीष जाधव यांच्या टेबलच्या बाजूला बसला. व त्याने कार्यालयाच्या कोपऱ्यात गुठखा थुंकल्याने क्लार्क मनीषा जाधव यांनी त्याला ही जागा थुंकण्याची नसून बाहेर जाऊन थुकायला सांगितल्याने या क्षुल्लक कारणांचा राग मनात ठेवून आरटीओ एजंट मचिंद्र केणे याने आपले तीन ते चार साथीदार बोलवून क्लार्क मनीष जाधव हे सातच्या सुमारास आपले काम आटपून घरी जायला निघाले असताना त्यांना आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अडवून
आरटीओ एजंट मचिंद्र केणे व त्याच्या साथीदारांनी धक्काबुक्की करीत त्याचा हाथ पिरगळीत दुखापत केल्याची माहिती आरटीओ च्या कर्मचाऱयांनी दिली या मारहाणीच्या घटने प्रकरणी मनीष जाधव व आरटीओ कर्मचारी वर्गाने खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यासाठी धाव घेतली असून पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱयांनी दिली.शासकीय कर्मचार्यावर वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या घटनेमुळे आरटीओ कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे .या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी कल्याण आरटीओ कार्यालयातील कर्मचारी काम बंद आंदोलन छेडणार असून जो पर्यंत मारहाण करणाऱ्या बेकायदेशीर आरटीओ एजंट मच्छिंद्र केणे व त्याच्या सांथीदाराना पोलीस अटक करत नाहीत तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे माहिती मोटार वाहन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन तायडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: