कल्याण तालुक्यातील वरप गावात अल्पवायिन मुलावर अज्ञात एसमान कडून

कल्याण तालुक्यातील वरप गावात अल्पवायिन मुलावर अज्ञात एसमान कडून

धारदार शस्त्राने हल्ला, पोलिसांत गुन्हा दाखल

दिनेश जाधव : कल्याण

वरप येथे धक्का दायक घटना घडली असून एका सहा वर्षीय मुलावर खूनी हल्ला झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे, सोशल मीडियावर घटना व्हायरल झाली असून पोलीस तपास करीत आहेत.
वरप येथील आत्माराम नगर येथे राहणारा देव पवार हा रविवारी दुपारी 3:30 दरम्यान चाळीशेजारी खेळता खेळता जवळच असलेल्या गल्लीत गेला होता दरम्यान रक्त बंबाळ अवस्थेत तेथील ग्रामस्थांना सापडल्याने त्यास त्वरित उपचारासाठी दवाखान्यात नेले परंतू त्याला जवळच्या कोणत्याही रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही शेवटी त्यास कळवा येथील रुग्णालयात दाखल केले तेथे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला डोक्यावरील जखमा ह्या धारधार शस्त्राने झाली असल्याचे नातेवाइकांनी सांगितले दरम्यान त्याच्यावर खूनी हल्ला झाल्याचं त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे परंतू मुलगा प्रचंड दहशती मध्ये असून तो मला कुत्र्याने चावा घेतल्याचं सतत म्हणत आहे. सदर घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिस तपास सुरु असून अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 326 नुसार गुन्हा दाखल करू असे टिटवाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: