
गुरांची अवैधरित्या विना परवाना वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल, चार गोवंश जप्त
प्रतिनिधी – उमेश पांढारकर (नंदुरबार)
नंदुरबार : शहरातील हॉटेल राजदरबारजवळ गुरांची अवैधरित्या विना परवाना वाहतूक केल्या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार गोवंश जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील विशाल गुलाब कोळी हा त्याच्या ताब्यातील वाहनात गुरांना दाटीवाटीने बांधून अवैधरित्या विना परवाना वाहतूक करतांना आढळून आला आहे .पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात चार गोवंश आढळून आली. या प्रकरणी पोना. स्वप्निल शिरसाठ यांनी फिर्याद दिली असून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात विशाल कोळी याच्याविरोधात प्राण्यांना संरक्षण अधिनियम १९६० चे कलम ११ (ड) मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ६६ चे उल्लंघन १९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोना. स्वप्निल पगारे करीत आहेत.