
दारुच्या नशेत वाहन चालविल्या प्रकरणी गुन्हा
प्रतिनिधी – उमेश पांढारकर (नंदुरबार)
धडगाव : धडगाव शहरातील पाटीलबाबा चौकातील रस्त्यावर दारु पिऊन वाहन चालविल्याने चालकाविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील वडफळ्या येथील विजय काशिनाथ वाडीले हा त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन (क्र.एम.एच.०४ एफपी ३८२१) धडगाव शहरातील पाटीलबाबा चौकातील रस्त्यावर दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आला. या प्रकरणी पोशि.विनोद पाटील यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात विजय वाडीले याच्याविरोधात भादंवि कलम १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोेहेकॉ. जाधव करीत आहेत.