अक्कलकुवा येथे विना परवानगी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अक्कलकुवा येथे विना परवानगी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी – उमेश पांढारकर (नंदूरबार)

नंदुरबार – प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणाऱ्या त्रिपुरा राज्यात घडलेल्या निषेध करण्यासाठी अक्कलकुवा येथे विना परवानगी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला म्हणून पंचवीस जणांच्या जमावा विरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा राज्यातील कथित घटनेचा निषेध म्हणून मुस्लिम समाजातील काही कार्यकर्त्यांनी अक्कलकुवा येथील हॉटेल फ्रेंड पासून मोलगी नाक्याच्या मार्गे तहसील कार्यालयावर रॅली नेण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी पोना. अमोल खवळे यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मोहसीन रफिक मक्राणी, रईस अली शेख, हमजु मोहम्मद मक्राणी, मुल्ला अल्लारखा नमुद मक्राणी, जुनेद अमीन मक्राणी, बिलाल युसुफ मक्राणी, लाला रफिक मक्राणी, मुफतलीक मुसा मक्राणी, शोएब शफि मोहम्मद मक्राणी , साजीद छोटुखा पिंजारी, राजु शेरू मक्राणी, युनुस शौकत मक्राणी , जाकीर शेख पूर्ण नाव माहित नाही सर्व रा. अक्कलकुवा व ईतर १० ते,
१५ इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: