
शहादा येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या महिलेस अटक
प्रतिनिधी – उमेश पांढारकर (नंदुरबार)
नंदुरबार : शहादा शहरातील जुने पोलिस लाईनसमोर गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित महिलेस अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील जुने पोलिस लाईनचे समोर असणाऱ्या एका चष्मे विक्रीच्या दुकानात सुरेखा उर्फ सांची गणेश गुजराथी (रा.नितीन नगर, शहादा) या महिलेने स्वत:च्या कब्जात ६ हजार रुपये किंमतीचे एक गावठी बनावट लोखंडी कट्टा बाळगतांना आढळून आली. याबाबत पोना.मणिलाल दिलीप पाडवी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात सुरेखा गुजराथी या महिलेविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३, ७ चे उल्लंघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित महिलेस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक माया राजपूत करीत आहेत.