
तळोदा शहरातील खटाईमाता मंदिराजवळील मोकळ्या मैदानात कत्तलीच्या इराद्याने बांधलेल्या २६ गोवंशांची सुटका
प्रतिनिधी – उमेश पांढारकर (नंदुरबार)
नंदुरबार : तळोदा शहरातील खटाईमाता मंदिराजवळील मोकळ्या मैदानात कत्तलीसाठी सुमारे सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे २६ गोवंश दोरखंडाने बांधून ठेवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा शहरातील खटाई माता मंदिराजवळील मोकळ्या जागेत पुरेसे अन्नपाणी व निवाऱ्याची व्यवस्था न करता २६ गोवंश कत्तलीच्या इराद्याने दोरखंडाने बांधून ठेवलेले आढळून आले. पोलिसांनी २ लाख २२ हजार रुपये किंमतीची २६ गोवंश जप्त केले केले आहेत. याबाबत पोशि.कांतीलाल वळवी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ बी चे उल्लंघन कलम ९ (अ), प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (च), महाराष्ट्र म्युनसिपल ॲक्ट १९६५ चे कलम २९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. पुढील तपास पाहेकॉ.सुधीर गायकवाड करीत आहेत.