
पोलीस महानगर : परवेज शेख
रस्त्यावर सापडलेलं पाकिट सुरक्षा रक्षक अधिकाऱ्याने मूळ मालकाचा शोध घेऊन परत केले आहे. पाकिटात कोणत्याही प्रकारचा संपर्क क्रमांक नसल्यामुळे सिक्युरिटी एजन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अंकुश ढमढेरे याच्याशी संपर्क साधून संबंधित मालकाचा शोध घेऊन पाकिट परत केले आहे.
अरुण सिताराम सुर्यवंशी यांचे हे पाकिट होते. सुरक्षा रक्षक अधिकारी यांनी प्रामाणिकपणे पाकिट परत केल्याबद्दल सुर्यवंशी यांनी त्यांचे आभार मानले व संबधित सुरक्षा रक्षक अधिकारी यांचा सिक्युरिटी एजन्सीकडून सन्मान ही करण्यात आला.
विशाल रमेश नायकोडी असे या सुरक्षा रक्षका अधिकाऱ्याचे नाव असून तो प्रोटेक्ट शिल्ड फोर्स या सिक्युरिटी एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक अधिकारी म्हणून काम करतात.
ते नेहमी प्रमाणे आपल्या कर्तव्यावर जात असताना. दिनांक २६/०५/२०२१ रोजी रात्री ८ वाजता पिपळे सौदागर येथे रस्त्यावर सापडले होते. अरुण सुर्यवंशी यांचे पाकिट प्रवासादरम्यान हरवलं होतं. विशाल नायकोडी यांना ते सापडले होते. पाकिटात पॅन कार्ड, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, आधारकार्ड, आर सी बुक, जास्त प्रमाणात रोख रक्कम व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. पण पाकिट परत करायचं तर संपर्क कसा साधायचा असा प्रश्न विशाल पुढे होता. यादरम्यान विशालने विविध प्रयत्न केले पण त्याला अरुण सुर्यवंशी यांचा संपर्क क्रमांक मिळू शकला नाही.
संपर्क क्रमांक मिळवण्यासाठी विशाल चे प्रयत्न सुरूच होते. यादरम्यान कंपनी व्यवस्थापनाकडून अंकुश ढमढेरे व विशाल यांनी वेगवेगळ्या मार्गाने शोध घेऊन अखेर मु.पो धोंडी दैठणा परभणी महाराष्ट्र येथील काही लोकांशी संपर्क साधून त्याने घडलेली हकीकत संबंधित व्यक्तीला सांगून सुर्यवंशी यांचा संपर्क क्रमांक मिळविला.
दरम्यान, आज (गुरुवार) अरुण सुर्यवंशी यांनी सुरक्षा रक्षक अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पाकिट परत घेतले. सुरक्षा रक्षक अधिकारी यांनी प्रामाणिकपणे पाकिट परत केल्याबद्दल त्यांनी विशाल नायकोडी यांचे मनापासून आभार मानले. व अंकुश ढमढेरे यांनी अशा प्रामाणिक सुरक्षारक्षकाची समाजाला गरज आहे. म्हणत विशाल याला शाबासकी दिली.
पाकिटात अनेक महत्त्वाची कागदपत्रे असतात. एकदा हारवल्यानंतर ती परत मिळवण्यासाठी खर्च येतो आणि मानसिक त्रासही होतो. त्यामुळे मूळ मालकाला त्याचं पाकिट मिळावं या विचाराने व माणुसकीच्या नात्याने पाकिट परत केल्याची भावना सुरक्षारक्षक अधिकारी विशाल नायकोडी याने व्यक्त केली.